padmasana

आजच्या काळात अनेक आजरांपासून स्वता:ला वाचवायचे असेल तर आपल्याला रोगप्रतिकरक शक्ति वाढवणे गरजेचे आहे पण रोगप्रतिकरक शक्तीसोबतच पोषक अन्न आणि योगाभ्यास करणे गरजेचे आहे. पद्मासन- Padmasana in marathi या लेखात पद्मासन म्हणजे काय? आणि त्याचे फायदे बघणार आहोत.

पद्मासन म्हणजे काय?

पद्म म्हणजे “कमळ ” आणि आसन म्हणजे “मुद्रा” . पद्मासन करताना आपल्या शरीराचा आकार कमळाप्रमाणे झालेला असतो म्हणून त्याला पद्मासन म्हंटले जाते. पद्मासनाला इंग्लिश मध्ये  “lotus pose” म्हंटले जाते.

पद्मासन केल्याने मानाचे शुद्धीकरण होते त्याचप्रमाणे काम ,क्रोध ,लोभ,मद ,मोह, मत्सर यांवर विजय मिळवणे सहज शक्य होते. ध्यानधारणेसाठी प्रामुख्याने ह्या आसनाचा उपयोग केला जातो. हे आसन मूलाधार चक्र उत्तेजित करते.पद्मासनाचे मानवाला खूप प्रकारचे फायदे होतात.चला तर मग जाणून घेऊया पद्मासन- Padmasana in marathi मध्ये  →

padmasana

पद्मासन करण्याची पद्धत

  • प्रथम योगा मॅट टाकून त्यावर पाय लांब करून बसावे.
  • पायाची मांडी घालून उजवा पाय डाव्या पायाच्या जांघेत आणि डावा पाय उजव्या पायाच्या जांघेत अशा प्रकारे ठेवावे.
  • अंगठा आणि तर्जनी (अंगठ्याशेजारचे बोट) एकमेकांना चिकटवून बाकीची बोटे सरळ ठेवावी.
  • उजवा हाथ उजव्या गुडघ्यावर तर डावा हाथ डाव्या गुडघ्यावर ठेवावा.
  • पाठीचा कणा आणि नजर सरळ ठेवावी .
  • डोळे बंद करून ध्यानस्थ आवस्थेत बसावे.

पद्मासन – Padmasana in hindi

पद्मासन करण्याचे फायदे

पद्मासन ज्याला लोटस पोज असेही म्हणतात, ही एक योग मुद्रा आहे जी शतकानुशतके चालत आली आहे आणि आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
 ही एक फायदेशीर सराव आहे जी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.

♦ पद्मासनाच्या नित्य सारवामुळे कळत न कळत आपल्याकडून ध्यानधारणा होते परिणामी मनशांतीसाठी त्याचा खूप फायदा होतो व आत्मप्राप्तीचा अनुभव सहज होतो.

♦ निद्रानाश असणाऱ्या व्यक्तींसाठी हे आसन वरदान आहे.

♦ पद्मासन आपला मणका सक्रिय आणि लवचिक ठेवण्यास मदत करते.

♦ पद्मासनामुळे अंतरस्त्रवि ग्रंथी (endocrine gland) कार्यक्षम बनतात.

♦ निद्रा ,दमा हे योग नित्य सराव केल्यास नाहीसे होतात.

♦ रक्तदाब संतुलित करण्यास मदत होते.

♦ पायातील रक्तवाहिन्या मोठ्या होणे यासारखे आजार होत नाहीत.

पद्मासन करताना घ्यावयाची काळजी

  • सुरुवातीला पद्मासन करताना पायांना त्रास होतो म्हणून सुरुवातीला हे आसन 1-2 मिनिटे करावे नित्य सराव झाल्यानंतर त्याची वेळ वाढवू शकता.
  • मांडी घालताना उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर व डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवावा पण वजन थोडे जास्त असणाऱ्या लोकांना हे शक्य नसते म्हणून फक्त डावा पाय उजव्या पायाच्या जांघेत ठेवला तरी चालेल.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही पद्मासन करण्याचा विचार करू शकता. पद्मासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

How To Do Padmasana: A Complete Guide To The Lotus Pose.

2 thoughts on “पद्मासन- Padmasana in marathi”
  1. […] पद्मासन – padmasana in marathi […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *