वृक्षासान

वृक्षासनाला इंग्लिश मध्ये ट्री पोझ (tree pose )नावाने ओळखले जाते. वृक्षासन – vrukshasan in marathi  या नावातच वृक्षासनाचे वैशिष्ट सामावले आहे. योगशास्त्रात वृक्षासनाला खूप महत्वाचे स्थान आहे.

वृक्षासन, किंवा tree pose, ही एक सामान्य योगासन आहे जी शतकानुशतके प्रचलित आहे. या आसनाचा उपयोग एखाद्याच्या योगाभ्यासात संतुलन आणि स्थिरता वाढवण्यासाठी केला जातो. व्रुक्षासनशी संबंधित अनेक फायदे आहेत, जसे की सुधारित मुद्रा, वाढलेली लवचिकता आणि ताकद आणि मन आणि शरीराला आराम. हे स्नायूंमधील तणाव आणि तणाव कमी करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे त्यांचे एकंदर आरोग्य सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्कृष्ट निवड बनते.

वृक्षासन म्हणजे काय?

वृक्षासन किंवा (tree pose) ही एक उत्कृष्ट स्टँडिंग योग पोझ आहे. वृक्षासान करत असताना आपल्या शरीराची स्थिति एखाद्या डौलदार व स्थिर वृक्षप्रमाणे होते म्हणून त्याला वृक्षासन नाव दिले गेले आहे.वृक्षासन हे नाव संस्कृत भाषेतून दिले गेले आहे. वृक्ष म्हणजे झाड आणि आसन म्हणजे पोझ/मुद्रा म्हणून त्याला वृक्षासन म्हंटले जाते.

वृक्षासन - Vrukshasan in marathi

आपल्या मनातील विविध भावना, ताण ,चिडचिड ,राग ,संताप यांवर वृक्षासान करून नियंत्रण मिळवू शकतो.चला तर जाणून घेऊया वृक्षासन – Vrukshasan in marathi→

वृक्षासान करण्याची पद्धत

  •  प्रथम आसन करत असताना सावधान स्थितीत उभे राहावे व हाथ सरळ रेषेत खाली असावे.
  •  उजव्या पायाचे पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूस जास्तीत जास्त वर असे ठेवावे.
  • हाथ सरळ वरच्या दिशेने नमस्कार या स्थितीत जास्तीत जास्त ताण पडेल या स्थितीत ठेवावे.
  • डोळे उघडे ठेऊन नेजर एखाद्या गोष्टीवर केंद्रित करावी, म्हणजे लक्ष स्थिर राहून शरीराचे संतुलन स्थिर राहण्यास मदत होते.
  • ही स्थिति 10-20 सेकंद करू शकता,नियमित सराव केल्यास त्यापेक्षा जास्त वेळही करू शकता.
  • या स्थितीत असताना श्वासोच्छवास संथपणे नियमित चालू ठेवावा.
  • पूर्वस्थितीत येण्यासाठी दीर्घ श्वास घेऊन हाथ खाली सरळ करावे व पूर्वस्थितीत यावे.
  • नंतर हीच स्थिति परत दुसऱ्या पायाने करावी.
  • वृक्षासनामध्ये शरीराचा तोल सांभाळणे खूप महत्वाचे असते.

वृक्षासनाचे फायदे

हे योगातील सर्वात प्रसिद्ध आसणांपैकी एक आहे आणि तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
वृक्षासन – vrukshasan in marathi हा लेख नियमितपणे व्रुक्षासनचा सराव करण्यासोबत मिळणाऱ्या असंख्य आरोग्य फायद्यांची चर्चा करेल.

♦ शारीरिक संतुलन राखण्यासाठी वृक्षासनाचा सराव केला जातो.

♦ हाथपायांना ताण पडल्यामुळे शरीराची लवचिकता वाढते .

सायटीक व संधीवाताच  त्रास असलेल्यांसाठी वृक्षासनाचा खूप फायदा होतो .

♦ वृक्षासान केल्यामुळे पाय व गुडघे यांमध्ये लवचिकता येते यामुळे हालचाल किवा कुठलेही काम करताना त्रास होत नाही.

♦ शारीरिक संतुलन आणि मानसिक तानावतून बाहेर पाडण्यासाठी वृक्षासनाचा खूप फायदा आहे. पण त्यासाठी नियमित सराव करणे गरजेचे आहे.

♦ वृक्षासान करत असताना लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे असते नियमित सराव केल्यास वृक्षासन खूप सहज करू शकतो. त्यामुळे एकाग्रतेचे प्रमाण वाढते.

♦ लहान मुलांच्या लक्षकेंद्रित करण्यासाठी व एकाग्रतेसाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.

♦ वृक्षासान (vrukshasan ) करत असताना लक्ष केंद्रित असते मन स्थिर असते त्यामुळे अप्रत्यक्षरित्या  आपण ध्यान (meditation) करत आसतो त्यामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते.

An Ultimate Guide To Vrukshasana – Tree Pose (Yoga).

वृक्षासान करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

  • वृक्षासान हे शक्यतो सकाळी करावे पण शक्य नसल्यास दिवसभरात केले तरी चालेल ,पण आसन  करण्याआधी तीन तास काहीही खाऊ नये.
  • आसन करताना पोट साफ असायला हवे.
  • सुरुवातीला वृक्षासान करताना तोल सांभाळणे खूप कठीण असते अशा वेळी सुरुवातीला काही दिवस तुम्ही भिंतीचा आधार घेऊन हे आसन करू शकता.
  • उच्च रक्तदाब(high blood pressure ),अर्धशिशी ,साटाकार ,हा त्रास होत असेल तर आसन करू नये किवा प्रशिक्षकाच्या सल्ल्याने आसन करावे.

श्वास घेण्याची पद्धत

  • वृक्षासान करत असताना हाथ जमिनीला समांतर करताना दीर्घ श्वास घ्यावा त्यानंतर श्वास संथ असावा.
  • पूर्वस्थितीत येताना परत दीर्घ श्वास घ्यावा.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही वृक्षासान करण्याचा विचार करू शकता.वृक्षासान योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

अधिक जानकारी  के लिये विजिट करे वृक्षासन – Vrukshasan in hindi

thats all for vrukshasan in marathi.

One thought on “वृक्षासन – Vrukshasan in marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *