shirshasana in marathi

शीर्षासन हे योगातील सर्वात प्रतिष्ठित आणि ओळखण्यायोग्य आसनांपैकी एक आहे. सामर्थ्य आणि संतुलनाचे प्रतीक म्हणून, शीर्षासन पोझ शतकानुशतके योगाच्या सरावाचा भाग आहे. भारतात, योगी प्राचीन काळापासून शारीरिक आरोग्य आणि मानसिक लक्ष केंद्रित करण्यासाठी हे कठीण आसन करत आहेत. हेडस्टँड पोझचा इतिहास श्वास, रक्ताभिसरण आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी वापरल्या जाणार्‍या योगिक तंत्रांशी जोडला गेला आहे. आम्ही शीर्षासन – shirshasana in marathi या लेखात शीर्षासनाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी संगीतल्या आहेत

शीर्षासन म्हणजे काय ?

शीर्षासनाला आसनांचा राजा म्हणतात. शीर्ष म्हणजे ‘मस्तक ‘. मस्तकावर उलटे उभे राहून संपूर्ण शरीराचा तोल सांभाळून हे आसन केले जाते म्हणून त्याला शीर्षासन म्हंटले जाते. शीर्षासनाला इंग्रजीमध्ये हेडस्टँड ( headstand pose ) म्हणतात.

शीर्षासन हे खूप सोप आसन मानले जाते पण करायला ते तितकेच कठीण आहे. चला तर मग जाणून घेऊया शीर्षासन – shirshasana in marathi मध्ये →

shirshasan

 शीर्षासन करण्याची योग्य पद्धत

  • सर्वप्रथम चटई अंथरूण त्यावर वज्रासनात बसावे व हाताची बोटे एकमेकांत गुंफून चटई वर ठेवावेत.
  • कपाळ खाली जमिनीला टेकवावे आणि एकमेकांत गुंतवलेले हाताची पंजे एकमेकांत गुंतवून मास्तकाला बाहेरून आधार होईल अशा स्थितीत ठेवावे .
  • त्यानंतर सावकाश शरीराचा तोल सांभाळत पाय सरळ करून पाठ आणि कंबरेचा भाग वरती उचलावा आणि धड डोक्याच्या दिशेने करावे,आणि शरीर सरळ करावे.
  • ह्या स्थितीत आल्यानंतर १-३ मिनिट (किवा शरीराला शक्य होईल एवढा वेळ) स्थिर राहावे.  नियमित सराव असल्यास जास्त वेळ आसन केले तरी चालेल.
  • ह्या आसन स्थितीत असताना दीर्घ श्वास चालू असावा.
  • पूर्वस्थितीत येताना प्रथम गुडघे मुडपून पोटाजवळ आणावे आणि हळूच जमिनीवर टेकवावे. काही सेकंद ह्याच स्थितीत थांबावे हळूहळू वज्रासनामध्ये बसावे.
  • हे आसन २-३ वेळा करावे.
  • आसन झाल्यानंतर शवासन करावे.

शीर्षासनाचे फायदे

♦ शीर्षासनामुळे मेंदूला रक्तपुरवठा भरपूर प्रमाणात होतो त्यामुळे मेंदूसंबंधित असणाऱ्या बऱ्याच समस्या दूर करू शकतो आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते.

♦ शरीराचे संतुलन रखण्यास खूप मदत होते त्यामुळे मन उत्साही राहते. शीर्षासनामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो . मन शांत राहते आणि ताण-तनाव दूर होण्यास मदत होते.

♦ नियमित पणे शीर्षासन केल्यास केसगळती संबंधित अनेक समस्यांचे निवारण होते. महत्वाचे म्हणजे या आसनाच्या नियमित सारवामुळे कवटी मजबूत होते व तिचे आरोग्य सुधारते परिणामी केसांसंबंधीत असणाऱ्या समस्या १)केस पांढरे होणे २)केस गळणे ३) केसांमध्ये कोंडा होणे ४) केस तुटणे अशा अनेक समस्यांपासून सुटका होते.

♦ मधुमेहला आटकावत आणण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे त्यामुळे मधुमेह पासून दूर राहण्यासाठी हे आसन करणे गरजेचे आहे.हे आसन केल्यामुळे स्वादुपिंड उत्तेजित होऊन इंसुलिन स्राव व्यवस्थित करण्यास मदत होते.

♦ शीर्षासन केल्याने बऱ्याच प्रमाणात लैंगिक समस्या दूर करण्यास मदत होते त्यामुळे आपण सेक्स लाइफ चा आनंद जास्त घेऊ शकतो.

♦ गर्भाशयासंबंधित विकार,दृष्टिदोष यांवर सुद्धा मात करू शकतो.

पचन संबंधित अनेक समस्या, अजीर्ण , पित्त ,गॅस इत्यादि समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते .

To read more in english visit What is Shirshasana? and Benefits Of Shirshasana

शीर्षासन करताना घ्यावयाची काळजी

  • मानेचा त्रास किवा इतर काही त्रास होत असेल तर शीर्षासन करू नये.
  • शीर्षासन करण्याआधी पोट स्वच्छ ,रिकामे असावे आणि आसन सकाळी भल्या पहाटे करावे.
  • मधुमेह, डोळ्याचा त्रास , कानाचे विकार, डोके दुखणे असे काही विकार असल्यास त्यांनी हे आसन करू नये.
  • स्त्रियांनी मासिकपाळी दरम्यान आणि गर्भधारणा असताना शीर्षासन करू नये.
  • सुरुवातीला आसन करताना भिंतीचा आधार घेऊन आसन केले तरी चालेल.
  • आसन करताना पूर्वस्थितीला येताना हळू हळू यावे एकदम हालचाल करू नये.

श्वास घेण्याची पद्धत

  • शरीर सरळ वरती करताना दीर्घ श्वास घ्यावा त्यांनंतर श्वास नियमित असावा व पूर्वस्थितीत यावे.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही शीर्षासन करण्याचा विचार करू शकता.शीर्षासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

शीर्षासन हिंदी मै जाणने के लिये विजिट करे शीर्षासन कैसे करे?

2 thoughts on “शीर्षासन – shirshasana in marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *