piu 2

आज प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की ,जीवनात सुख शांती समाधान असावे. आणि त्यासाठी तो सतत प्रयत्नशील राहतो. आजच्या भौतिक जगात मनुष्य भौतिक सुख -सुविधा शोधत आहे. पण यांमुळे मनुष्य अजून दु:खी होत चालला आहे,आपल्या वास्तविकतेपासून दूर होत आहे म्हणून Types of yoga – योगा चे प्रकार खाली दिले आहे

मनुष्य हा सर्व प्राणिमात्रापैकी सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्याच्याजवळ विवेकशक्ती आहे.पण मानवी मूल्यांचा रास आणि नाकारात्मकता वाढल्याने मनुष्याच्या दु:ख, तानावत वाढ होत चालली आहे.

yoga meditation

Types of yoga – योगा चे प्रकार

योगाचे एकूण सहा प्रकार आहेत

♥ राजयोग

♥ हठयोग

♥ लययोग

♥ ज्ञानयोग

♥ कर्मयोग

♥ भक्तियोग 

राजयोग

भारत सुरुवातीपासूनच योग आणि आध्यात्मिक शिक्षण देण्यास अग्रेसर आहे. भौतिक सुखपेक्षा आत्मिक समाधान गरजेचे आहे,आणि ते योगामुळेच प्राप्त होऊ शकते. म्हणून मनुष्याच्या जीवनात सुख शांती प्राप्त करण्यासाठी राजयोगाची नितांत आवश्यकता आहे .

राजयोग ही अनेक वर्षापासून आध्यात्मिक ग्रंथानद्वारे संदर्भित योगाची सर्वात जुनी प्रणाली आहे. समाधी (चैतन्य) ध्यानची अंतिम स्थिति मानली जाते. म्हणून राजयोग योगाचे अंतिम लक्ष मानले जाते. राजयोग मनावर आणि मानसिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीचा अवलंब करतो. राजयोग हा सर्व योगाची गुरुकिल्ली मानला जातो.

राजयोगाला अष्टांग योग असेही म्हटले जाते. महर्षि पतंजलिनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक “राजयोग ” यात योगाच्या आठ प्रकाराबद्दल सांगितले आहे.

  1. यम – यम (आत्म संयम )
  2. नियम – आत्म अनुशासन (वयक्तिक शिस्त )
  3. आसन – मुद्रा (पवित्रा )
  4. प्राणायाम – श्वास नियंत्रण (प्राणांचे नियंत्रण )
  5. प्रतिहार – संवेदनांचा माघार
  6. धारणा – एकाग्रता
  7. ध्यान – ध्यान (meditation )
  8. समाधी – समाधी

राजयोगाचे अंतरंग आणि बहिरंग असे दोन प्रकार पडतात

अंतरंग – यम , नियम ,आसन ,प्राणायाम ,प्रतिहार

बहिरंग – धारणा,ध्यान,समाधी

राजयोगाच्या अभ्यासामध्ये योगाच्या विविध टप्प्यांद्वारे आत्म-जागरूकता, ध्यान आणि आध्यात्मिक शिस्त विकसित करणे समाविष्ट आहे. असे मानले जाते की ते एखाद्याचे खरे स्वरूप समजून घेण्यास आणि आध्यात्मिक मुक्ती किंवा ज्ञान प्राप्त करण्यास प्रवृत्त करते.

यम –

यम म्हणजे साधकासाठी नैतिक सामाजिक मार्गदर्शक तत्वे.

यम पाच प्रकारचे आहेत

  • अहिंसा
  • सत्य
  • अस्तेय
  • ब्रह्मचर्य
  • अपरिग्रह

अहिंसा

अहिंसा म्हणजे दुसऱ्या कोणाप्रति किवा स्वत:प्रति कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे. दुसऱ्या कोणाप्रति किवा स्वत:प्रति केलेले कोणतेही राग येणारे, टिकात्मक ठरवणारे ,हानी पोहचवणारे ,चीड आणणारे शारीरिक किवा मानसिक कृत्य म्हणजेच हिंसा.

या खोल रुजलेल्या संकल्पनेची जाणीव साधकाला असली पाहिजे. त्याने योगाभ्यास किवा सामाज्याच्या विकासात भर घालणारे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

सत्य

योगसाधकाने  नेहमी खरे वागले पाहिजे. स्वत:प्रती व इतरांप्रति खरे राहिले पाहिजे. सत्यतापूर्ण आयुष्य जगने फार कठीण आहे पण सत्याच्या वाटेवर चालत राहिल्यास मानाचे ,आदरचे आयुष्य मिळते म्हणून तिथे डगमगू नये. असे आयुष्य (जीवन ) योगसाधकासाठी आवश्यक आहे .

अस्तेय

अस्तेय म्हणजे चोरी करणे. याचा अर्थ आपल्या मालकीचे किवा हक्काचे नसताना आपण ती गोष्ट किवा वस्तु घेऊ नये . चोरी फक्त भौतिक किवा नैतिक गोष्टींची नसते तर मानसिक स्तरावरील चोरीचाही यात समावेश होतो. आपण आपल्या सुखासाठी दुसऱ्याच्या मनाची शांती आणि आनंद हिरावून घेऊ शकत नाही म्हणून चोरीचा विचारही मनात यायला नाही पाहिजे.

ब्रह्मचर्य

ब्रह्मचर्य  म्हणजेच  आत्मसंयम राखणे. याला गरज असते मानसिक दृष्ट्या मजबूत असण्याची . धैर्य ,इच्छाशक्ती ,मजबूत करण्याची गरज भासते . टोकाच्या सवयी ,व्यसन व मनात दाटलेल्या उर्मीवर मात केली पाहिजे . साधक अधिक निरोगी ,मानसिक दृष्ट्या अधिक बळकट होतो .

अपरिग्रह

अपरिग्रह म्हणजे लोभाचा नाश करणे. अपरिग्रह याचा अर्थ आपल्या मालकीच्या (हक्काच्या) पण गरजेपेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिक ,मानसिक किवा भावनिकरित्या त्याग करणे. त्यामुळे माणसाला साधे आयुष्य जगण्यास मदत होते.

नियम

नियम हे अष्टांग योगातील दुसरी पायरी आहे. स्वत:चे निरीक्षण करून स्वत:बद्दल अधिकाधिक जागरूक होण्यासाठी आपल्यातच असलेला एक आरसा आहे. नियमाचे पाच भाग आहेत.

  • सौच
  • संतोष
  • तापस
  • स्वाध्याय
  • ईश्वरप्रणिधान

सौच -सौच हे वातावरणाचे अंतर्गत व बाह्य शुद्धीकरण आहे. यामध्ये आपल्या आजूबाजूला कशामुळे आणि का अशुद्धी निर्माण होते हे शोधून त्याचा नाश करण्याचा सोपा मार्ग आहे .

संतोष – संतोष म्हणजे समाधानी राहणे. याचा अर्थ कोणत्याही गोष्टीबद्दल लालसा ,हाव किवा गरज कमी करणे म्हणजे संतोष.

तापस – तापस हा स्वयमशिसतीचा सराव आहे .

स्वाध्याय – स्वाध्याय म्हणजे स्वत;चा अभ्यास करणे.

ईश्वरप्रणिधान  – दिव्यत्वाला शरण जाणे .

आसन

आसन शरीराला मजबूत ठेवण्यास मदत करते . आसन म्हणजे एक अशी स्थिति ज्यामध्ये तुम्ही तुमचे शरीर आणि मन शांत, स्थिर आणि आनंदी ठेऊ शकता .

प्राणायाम

अष्टांगापैकी हे चौथ्या नंबर च अंग आहे. हे योगसाधनेच एक भाग आहे . यामध्ये शरीर आणि मन निरोगी ठेऊन समद्धीकरता आवश्यक असलेली योग्यता प्राप्त करते

प्रत्याहार

प्रत्याहार म्हणजे अनावश्यक गोष्टी किवा अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींतून आपल्या संवेदना काढून घेण्यास प्रत्याहार अंगाची मदत होते. हे अंग ध्यानच्या प्रक्रियेत मदत करते. हे अंग त्या व्यक्तीला आपल्या आतील अस्तित्वाकडे घेऊन जाण्यास मदत करते. त्यामुळे मनाची प्रतिकार शक्ति वाढते.

धारणा

धारणा म्हणजे हा चांगला तो वाईट,हलका भारी ही सर्व ‘भेद ‘बुद्धी मनातून काढून एकाग्रचित्त (अविचलीत मन) आपल्या काबूत ठेवणे यालाच धारणा म्हणतात.एखाद्या व्यक्तीने तिचे लक्ष एक बिंदुवर एकाग्र करणे. यासाठी खूप सरावाची आवश्यकता असते. पण एकदा का याला यश आले की मनाला निश्चित उद्दिष्टाकडे वळवण्यात खूप मदत होते.

ध्यान

ध्यान म्हणजे एकरूप होणे. ध्यानची पद्धत खूप सोपी आहे. ध्यान करून आपल्या भरपूर ऊर्जा व आध्यात्मिक ज्ञान मिळते. ध्यानचे अनेक फायदे आहेत.ध्यान हे समाधान आणि आनंद यांपर्यंत पोहचवण्याचे दार आहे .

shambho

समाधी

समाधी या अवस्थेत योगसाधकाला धन्यता आणि आनंद प्राप्त होतो. समाधी ही अखेरची आवस्था आहे आणि योगाभ्यासातील अखेरचा टप्पा आहे.

To Know more about this in English Visit Sillypharma.com

हठयोग 

ह- म्हणजे सूर्य ,ठ – म्हणजे चंद्र यांचा जो संयोग होतो त्याला हठयोग म्हणतात. हठयोग ही एक विशिष्ठ प्रकारची विद्या आहे.राजयोगपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक आसलेली ऊंची गाठण्याची शिडी अशी हठयोगाची ओळख ऋषि योगी स्वात्माराम  यांनी करून दिली.15 व्या शतकात ऋषि योगी स्वात्माराम यांनी हठ योगाची रचना केली आणि त्यात त्यांनी Types of yoga – योगा चे प्रकार सांगितले .

हठयोग हे आसन श्वासोच्छवासाचा शास्त्रोक्त अभ्यास होय. हठयोगाने शरीरात उत्साह राहतो. देह हा सुंदर आहे आणि तो शेवटपर्यंत सुंदरच राहिला पाहिजे. त्यासाठी मोठमोठ्या ऋषींनी हठयोगाची मदत घेतली आणि त्याचे महत्वही आवर्जून सांगितले . देहाचा जास्तीत जास्त वापर वाढल्याने योग संपत चालला आहे आणि तांत्रिकता वाढली आहे . त्यामुळे हठयोगाचे पुन्हा एकदा महत्व सांगितले गेले .

लययोग 

लाययोगालाच कुंडलीनी योग असेही म्हणतात.

शरीरात एकूण षटचक्रे आहेत.

  • सहस्रत्रार चक्र
  • आज्ञा चक्र
  • विशुद्धी चक्र
  • अनाहत चक्र
  • मणीपुर चक्र
  • सवाधिष्ठान चक्र
  • मूलाधार चक्र

कुंडलीनी ही मानवी शरीरात असलेली दिव्य शक्ति आहे. सुप्तावस्थेत आसलेली ही शक्ति जागृत कशी करावी याचा मार्ग सांगितला गेला आहे . ही शक्ति जागृत झाल्यावर त्याचे खूप परिणाम बघायला मिळतात. ते सामान्य बुद्धीला न समजण्यासारखे असतात. त्यामुळे ते चमत्कारसारखे भासतात. कुंडलिनी योग म्हणजे सुप्तावस्थेत असलेल्या शक्तिला एक -एक करत सतही चक्र जागृत करणे हाच कुंडलिनी योग्यच मार्ग आहे.

ज्ञानयोग

ज्ञान हे आयुष्यात खूप महत्वाचे आहे. ज्ञानाला कोणीही हरवू शकत नाही फक्त ते आत्मसात करण्याची कला आणि जिज्ञासा असली पाहिजे . हे पवित्र ज्ञान एखाद्या तत्वदर्शी गुरूच्या सहाय्याने स्वतः अनुभवायचे असते. ज्ञान मिळवण्यासाठी गुरुकडे नम्रतेने जायला हवे. अहंकारी माणसाला ज्ञानप्राप्ती होणे कठीण असते. ज्ञानासाठी श्रद्धेची नितांत आवश्यकता असते. गुरुलाच सर्वस्व मानून त्यांच्यावर श्रद्धा ठेवून सेवा केली पाहिजे व योग्य वेळेची वाट पहिली पाहिजे

ज्ञानयोगात, मनाच्या आणि अहंकाराच्या मर्यादा ओलांडून अंतिम सत्याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने साधक खोल आत्म-तपास आणि चिंतनात गुंततो. हा मार्ग उपनिषदांसारख्या पवित्र ग्रंथांच्या अभ्यासावर आणि अंतर्दृष्टी आणि समज विकसित करण्यासाठी ध्यानाच्या अभ्यासावर भर देतो.

कर्मयोग 

कर्म करणे म्हणजेच कर्मयोग आहे.चांगले कर्म करत राहावे व फळाची अपेक्षा करू नये असे महान ऋषींनी लिहून ठेवले आहे. कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करता सुख -दु:ख ,राग – द्वेष ,लाभ – अलाभ ,जय – पराजय याची अपेक्षा न करता कर्म करीत राहणे म्हणजे कर्मयोग होय.

परमात्मा म्हणजेच परमेश्वर परमेश्वरचा साक्षात्कार करून घेण्यासाठी कर्माला भक्तीयोगाची जोड द्यावी लागते. भक्तियोग ,कर्मयोग ही ज्ञानयोगाची अंगे आहेत. शंकराचार्याणच्या मते ज्ञानयोग हा मोक्षप्राप्तिसाठी मुख्य साधन आहे. संन्यास घेणे म्हणजेच कर्माचा संन्यास करणे. कर्माचा संन्यास केल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही .

भक्तियोग 

भक्तियोग ही हिंदू र्मातील अत्यंत प्राचीन परंपरा आहे. भक्तियोग हा आध्यात्मिक साधनेचा मार्ग  आहे. या प्रकारात आपल्या आवडत्या देवतेला प्रेमाने आणि भक्तिभावाने पूजले जाते. ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्याबरोबरच भक्तियोग साध्य होऊ शकतो .

भक्तिमार्ग , कर्ममार्ग व ज्ञानमार्ग हे परमेश्वर प्राप्तीचे मुख्य मार्ग आहेत. पतंजलिनी भक्तिमार्ग आणि अष्टांगमार्ग असे योग शास्त्राचे दोन भाग केले आहे. प्रत्येक व्यक्तीने अहंकार बाजूला ठेऊन परमेश्वराची सेवा केली पाहिजे . भजन हा भक्तिमार्गाचा सर्वात सोपा प्रकार आहे.

योगा करते समय किन बातों का ध्यान रखना चाहिए? हिंदीमध्ये जाणून घ्या.  

2 thoughts on “Types of yoga – योगा चे प्रकार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *