March 3, 2024
cat pose 1

सृष्टीमध्ये असलेल्या या विविध गोष्टींकडून खूप काही शिकण्यासारखे आसते, फक्त बघण्याचा दृष्टिकोण तसा असला पाहिजे. आपण या लेखात पाळीव प्राण्यांकडून काहीतरी शिकणार आहे.

मार्जारासन हे योगासणांपैकी एक महत्वपूर्ण आसन आहे. मार्जारासनालाच इंग्लिशमध्ये cat pose नावाने ओळखले जाते . मार्जारासन करण्यासाठी वयाचे बंधन नसल्याने कुठल्याही वयाचे व्यक्ति हे आसन अगदी सहज पद्धतीने करू शकतात. हे आसन करायला जरी सोपे असले तरी त्याचे अनेक फायदे आहेत.

मार्जारासनात असलेल्या व्यक्तीला मांजरिप्रमाणे हालचाल करावी लागते. मांजरीशी संबंधित असलेली cat walk (कॅट वॉक) ही संकल्पना खूप प्रसिद्ध झाली होती तसेच मांजरीशी संबंधित असलेली योगासणांपैकी मार्जारासन या आसनाविषयी माहिती बघणार आहोत. चला तर जाणून घेऊया marjariasana in marathi  पुढीलप्रमाणे

Cat-Stretch-Pose
google

मार्जारासन म्हणजे काय?

आपल्या घरात पाळला जाणार प्राणी म्हणजे मांजर. मांजराच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवले असता , लक्षात येईल मांजर शरीर ताणते त्याच्या या क्रियेवरूनच मार्जारियासन हे नाव दिले गेले.

मार्जारियासन हा संस्कृत शब्द आहे. मार्जारियासन दोन भागात विभागले असता “मार्जारा” आणि “आसन” असे दोन भाग पडतात. मार्जारा म्हणजे मांजरिप्रमाणे शरीर ताणने आणि आसन म्हणजे स्थिति म्हणूनच याला मार्जारियासन म्हणतात.

Marjariasana – मार्जरासन कैसे करे? जनिये हिंदी मै

मार्जारासन करण्याची योग्य पद्धत

 • मार्जारासन करताना सर्वप्रथम योगा मॅटवर बसावे , त्यानंतर गुडघे योगा मॅटवर ठेवावे आणि सरळ राहावे.
 • ह्या स्थितीत आसताना तुम्हाला वज्रासन या  मुद्रेत असल्याचे लक्षात येईल.
 • तुमचे हात समोरच्या दिशेला सरळ नेऊन योगा मॅटवर खाली टेकवा
 • आता मनगटावर हळू – हळू शरीराचे वजन देऊन पाठीमागचा भाग (नितंबाचा) भाग वर उचलावा.
 • तुम्ही नितंबाचा भाग वर उचलल्यामुळे तुमच्या दोन्ही मांड्या सरळ रेषेत येतील आणि तुमच्या गुडघ्यामध्ये ९० अंशाचा कोण तयार होईल .
 • ह्या आसन स्थितीत असताना तुमच्या छातीचा भाग जमिनीला समांतर असेल आणि तुमचे शरीर मांजरिप्रमाणे दिसेल.
 • आता दीर्घ श्वास घ्यावा. दीर्घ श्वास घेताना हनुवटी वर घ्यावी आणि डोक्याचा भाग मागच्या दिशेला न्यावा. नाभिला खालच्या दिशेला तर माकडहाड  वरच्या दिशेला वरती खेचावे .
 • ह्या आसन स्थितीत काही वेळ थांबावे.
 • श्वासोच्छवास संथ असावा.
 • हळू-हळू परत पूर्वस्थितीत यावे.
 • ही क्रिया ५-६ वेळा करावी किवा तुमच्या शरीराला शक्य होईल तेवढ.
 • सुरुवातीला हे आसन करणे आवघड जाऊ शकते पण नियमित सराव केल्यास हे सहज शक्य होते.

 

 टिप – योगसाधकांच्या मते तुम्ही जेव्हा ही क्रिया सावकाश आणि डौलदार पद्धतीने करता तेव्हा त्याचा अधिक फायदेशीर परिणाम शरीरावर बघायला मिळेल.

 

मार्जारासन करण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत , चला तर जाणून घेऊयामार्जारासनाचे फायदे  marjariasana in marathi  मध्ये →

मार्जारासन करण्याचे फायदे

♦ खांदे , मनगटे यांना बळकटी येते.

♦ पचणक्रिया सुधारते .

♦ पाठीचा कणा व माकडहाड यावर ताण पडल्याने पाठीसंबंधित अनेक समस्या दूर होतात.

रक्ताभिसरण सुधारते.

♦ शरीर स्वस्थ राहते आणि मन शांत आणि प्रसन्न राहते.

मार्जारासन करताना घ्यावयाची काळजी

 1. पाठ , मान किवा मणक्याचा काही त्रास असल्यास मार्जारियासन करू नये.
 2. आसन करताना हाताची कोपरे वाकवू नये, त्याकडे लक्ष द्यावे

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही मार्जारासन करण्याचा विचार करू शकता.  मार्जारासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

How to Do the Marjariasana for a Toned and Strong Core


 

1 thought on “marjariasana in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *