सुखासन हे सर्व योगासनांपैकी सर्वात सोपे आसन आहे. योगसाधक ध्यान – धारणा करण्यासाठी सुखासना मध्येच बसतात तसेच प्राचीन ऋषि – मुनींची तपस्येची हीच मुद्रा होती. म्हणून ध्यानधारणा करताना शक्यतो ह्याच आसनात बसतात. चला तर जाणून घेऊया सुखासन करण्याची योग्य पद्धत,फायदे आणि काळजी पुढीलप्रमाणे

sukhasana pose 1

सुखासन म्हणजे काय?

सुखासनाच्या नावातच सर्व काही सामावले आहे. “सुख” आणि “आसन” या दोन शब्दांच्या संयोगातून सुखासन तयार झाले आहे. सुख म्हणजे आनंद किवा आराम मिळणे आणि आसन म्हणजे बसण्याची स्थिति.

सुखासन हे हठयोग साधनेतील सर्वात सोप्या आसनांपैकी एक आहे. सुखासनालाच  इंग्लिश मध्ये एजी पोज (easy pose) म्हणतात. कोणत्याही वयाचे योगसाधक हे आसन अगदी सहज करू शकतात.

सुखासनाचा नियमित सराव केल्यास मेंदू आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चला तर जाणून घेऊया सुखासन करण्याची योग्य पद्धत,फायदे आणि काळजी पुढीलप्रमाणे

सुखासन करण्याची योग्य पद्धत

  • सुखासन करताना प्रथम योगा मॅट वर बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा आणि पाय समोर पसरून बसा.
  • त्यानंतर दोन्ही पाय दुडघ्यात वाकवून मांडि घालून बसा. गुडघे बाहेरच्या बाजूला येतील ह्या स्थितीत बसा.
  • तुम्ही आरामात बसला आहात का याकडे लक्ष द्या. गुडघे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही मांडि घालून बसला तेव्हा तुमच्या ओटीपोत आणि पायात त्रिकोण आकार तयार झाला असेल.
  • मांडि घालून बसल्यानंतर पाठीचा कणा ताठ असावा, खांदे ताणलेले असावेत.
  • पाठीचा कणा आणि माकडहाड यांचे संतुलन व्यवस्थित ठेवा.
  • ह्या आसन स्थितीत हवे तेवढा वेळ बसू शकता तुमच्या शरीराला आराम वाटत नाही तोपर्यंत.
  • या आसनस्थितीत थांबल्यानंतर परत पूर्वस्थितीत यावे आणि दुसऱ्या पायाने मांडि घालून हे आसन परत करावे किवा आसन करताना कधी उजवा पाय तर कधी डाव्या पायाची मांडि घालून हे आसन करावे.

सुखासन 1

Sukhasana in hindi 

सुखासनाचे फायदे

♦ सुखासनाच्या नियमित सरावाने मेंदू आणि शरीर यांतील संतुलन राखले जाते.

♦ हे आसन केल्याने चक्र आणि कुंडलिनी यांना उत्तेजित करण्यास मदत होते.

♦ सुखासन नियमित केल्यास छाती आणि कॉलरा बोन ताणले जाऊन ते लवचिक व मजबूत होण्यास मदत होते.

♦ सुखासन नियमित केल्यास पाठीचा कणा, गुडघे आणि पायाचे स्नायू मजबूत होतात.

♦ ह्या आसनाच्या नियमित सरावाने नैराश्य, मनोविकार यांसारख्या आजरांपासून आराम मिळण्यास मदत होते.

♦ मन शांत राहते व शरीर ताजेतवाने राहते.

सुखासन करताना घ्यावयाची काळजी

  1. सुखासन करण्याआधी पोट साफ असायला हवे.
  2. सुखासन हे शक्यतो सकाळच्या वेळी करावे.
  3. सुखासन हे उपाशीपोटीच करावे असे नाही परंतु सुखासन करण्याआधी दुसरी योगासने करायची आसल्यास योगासनाआधी 4-5 तास काही खाऊ नये.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही सुखासन करण्याचा विचार करू शकता.  सुखासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

मित्रांनो सुखासनाचे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे स्थान आहे हे आपण वरीलप्रमाणे बघितलेच आहे , या लेखात आपण सुखासन करण्याची योग्य पद्धत,फायदे आणि काळजी बघितले. योगासनांच्या योग्य पद्धतीचा वापर करून आपण आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ सुधारूया.

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

How to Sit Like a King: Sukhasana for Beginners

2 thoughts on “सुखासन करण्याची योग्य पद्धत,फायदे आणि काळजी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *