baddhakonasana 1

सध्याच्या धावपळीच्या जगात तसेच बदलत्या वातावरणामुळे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहे. तसेच करोना काळात वर्क फ्रॉम होम ची संकल्पना उदयास आली. त्यामुळे लोक घरात राहून काम करू लागले. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ लागल्या. जीम बंद असल्यामुळे तसेच योगा क्लासेस बंद असल्यामुळे लोकांची व्यायामाची सवय मोडली.योग साधनेसाठी विशिष्ट जागेची किवा वयाची गरज नसल्याने ते कधीही आणि कोठेही करू शकतो, तसेच योगा चे आपल्याला अमूल्य असे फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया बद्धकोणासन – Butterfly pose in marathi मराठीमध्ये पुढीलप्रमाणे ⇒

अशा वेळी बहुतांश उत्साही योग साधकांनी “योग साधनेचा मार्ग “अवलंबला. मागील लेखात  Yoga in Marathi (योग म्हणजे काय ?) या बद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे.

 

butterfly pose 1

बद्धकोणासन म्हणजे काय ?

बद्धकोणासनास तीन ठिकाणी विभागले असता ‘बद्ध – म्हणजे बंद किवा अडकलेला’ ,बद्ध हा संस्कृत भाषेतला शब्द आहे.  कोण – म्हणजे बिजगणितातील कोण किवा डिग्री अँगल असा घेतला आहे, आणि आसन म्हणजे बसण्याची स्थिति असा होतो.

हे आसन करत असताना दोन्ही पायाची पावले जांघेजवळ घेऊन , दोन्ही हातांनी त्यांना विशिष्ट कोणात पकडून दोन्ही पाय फुलपाखराच्या पांखाप्रमाणे वर खाली केली जातात म्हणून त्याला बटरफ्लाय आसन (Buttrefly pose) देखील म्हंटले जाते.

तसेच हे आसन करत असताना शरीराची स्थिति चप्पल किवा बूट शिवणारे चांभार याप्रमाणे असल्याने याला इंग्लिश मध्ये cobbler pose (चांभार आसन ) असेही म्हणतात.

बद्धकोणासन करण्याची योग्य पद्धत

  • प्रथम योगा मॅट टाकून खाली सरळ बसावे आणि पाय समोरच्या बाजूने पसरून द्यावे.
  • पाय गुडघ्यात दुमडून पाऊले पोटाच्या दिशेने आत आणण्याचा शक्य होईल तितका प्रयत्न करावा.
  • पायाचे तळवे समोरच्या दिशेने अधांतरी असतात त्यांना आधार देत हाथ तळपायच्या खाली ठेवून पायाची अंगठे पकडावी. (आकृतीत दाखवल्याप्रमाणे)
  • दोन्ही पायाची तळवे एकमेकांना स्पर्श करतात की नाही याची खात्री करावी. तळवे पोटाच्या दिशेने खेचले असता गुडघे वरती अधांतरी असतात त्यांना खाली जमिनीच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करावा किवा शक्य असेल तर जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा.
  • पायाची तळवे एकमेकांना स्पर्श होईल अशी ठेवावी आणि ते पोटाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करावा हे करत असताना गुडघा आणि मांडीवर हळू-हळू ताण देऊन पाय जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करावा. नियमित सराव केल्यास हे सहज शक्य होईल.
  • ह्या आसनात असताना पाठीचा कणा ताठ असावा त्यामुळे शरीराचा जोर नितंबावर गेल्याचे जाणवेल , ताठ बसल्यामुळे नितंबाच्या हाडांना बळकटी येते.
  • आता फुलपाखरू जसे आपले पंख उडवते तसे पाय वर – खाली करावे, सुरुवातीला हळू – हळू करावे आणि नंतर वेग वाढवावा.
  • श्वासोच्छवास सामान्य असावा.
  • मांडि आणि जांघेत ताण पडतोय की नाही त्याकडे लक्ष द्यावे. शक्य तितकाच ताण द्यावा जास्त ताण देऊ नये.
  • या आसनस्थितीत असताना 1-5 मिनिटे थांबावे किवा शक्य होईल तेवढा वेळ करावे. नियमित सराव असल्यास जास्त वेळ केले तरी चालेल.
  • त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन पाय बाजूला करून समोरच्या दिशेला सरळ करावे आणि पूर्वस्थितीत यावे.

बद्धकोणासन (तितली आसन) हिंदी मै 

बद्धकोणासन करायला जरी सोपे असले तरी त्याचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया बद्धकोणासनाचे फायदे बद्धकोणासन – Butterfly pose in marathi पुढीलप्रमाणे

बद्धकोणासनाचे फायदे

♦ मांड्या , जांघ व पायाची आतील बाजू यावर ताण पडल्यामुळे ते लवचिक होतात आणि त्याठिकाणची चरबी कमी करण्यास मदत होते.

♦ पाठीचा कणा ताठ आसल्यामुळे पाठीला ताण पडतो त्यामुळे पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत होतो.

सायटिका आजारापासून सुटका होण्यास मदत होते.

♦ नियमित सराव केल्यास मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत होते, व नंतर राजोनिरुत्तीच्या लक्षणांपासून सुटका करण्यास मदत होते.

♦ मानसिक व शारीरिक ताण – तनाव दूर होऊन मन शांत राहण्यास मदत होते.

♦ गरोदर असताना शेवटच्या काही दिवसात हे आसन केल्यास प्रसूतिच्या वेदना सहन करण्याची क्षमता वाढते व प्रसूती सुखरूप होण्यास मदत होते.

Butterfly-Pose
google

बद्धकोणासन करताना घ्यावयाची काळजी

  1. सायटिकाची समस्या असल्यास गादी किवा उशीच्या मदतीने हे आसन करावे.
  2. गुडघ्याला काही दुखापत असल्यास हे आसन करू नये किवा प्रशिक्षकाच्या सल्ल्याने करावे.
  3. फुलपाखराचे पंख उडल्यासारखे पाय वर खाली करताना शक्य तितकाच ताण द्यावा जास्त ताण देऊ नये.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही बद्धकोणासन (butterfly pose) करण्याचा विचार करू शकता.  बद्धकोणासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

How To Do The Baddhakonasana Yoga Pose: A Complete Guide

3 thoughts on “बद्धकोणासन – Butterfly pose in marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *