gomukhasana 1

गोमुखासन म्हणजे काय ?

गोमुखासन हा संस्कृत भाषेतील शब्द आहे.’ गो’ आणि ‘मुखासन’  या दोन शब्दांच्या संयोगातून गोमुखासन नाव दिले गेले आहे. गोमुखासनाला इंग्लिश मध्ये ( cow face pose ) काऊ फेस पोज  म्हणतात.

गो म्हणजे “गाय”, मुखासन म्हणजे “गाईच्या मुखासारखे आसन”. गोमुखासन करत आसताना  आपल्या शरीराचा आकार हा गाईच्या मुखासारखा दिसतो म्हणून त्याला गोमुखासन म्हंटले जाते. हे आसन करायला खूप सोपे आहे.

हठयोग श्रेणीतील हे खूप प्रचलित आसन आहे . चला तर जाणून घेऊया गोमुखासन करण्याची पद्धत आणि फायदे पुढीलप्रमाणे

gomukhasana
ठ  from google

गोमुखासन करण्याची पद्धत

  • गोमुखासन करण्याआधी प्रथम मोकळ्या किवा हवेशीर जाग्यावर जाऊन योगा मॅटवर पद्मासनात बसावे.
  • प्रथम उजव्या पायाला शरीराच्या दिशेने जवळ खेचावे. उजव्या पायाची टाच नितंबाच्या डाव्या बाजूला येईल अशा पद्धतीने ठेवावे.
  • डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर वरतून शरीराच्या जवळ घ्यावा. वरती आकृतीत दाखवल्याप्रमाणे करावे.
  • आता आपला उजवा हाथ कोपरात वाकवून खांद्याजवळ न्यावा, आणि शक्य तितका पाठीमागच्या बाजूला ताणून धरावा.
  • डावा हाथ पोटाच्या बाजूने कोपरात वाकवून उजव्या हाताच्या दिशेने न्यावा.
  • शक्य तितका ताण देत दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफन्याचा प्रयत्न करावा. (शक्य होईल तितकाच ताण द्यावा)
  • शरीराचा वरचा भाग आणि मस्तक सरळ आणि ताठ असावे.
  • ह्या आसन स्थितीत काही काळ तसेच थांबावे आणि हळू – हळू श्वासोच्छवास चालू असावा.
  • ह्या आसन स्थितीत असताना जेव्हा अवघडल्यासारखे वाटेल तेव्हा पूर्व स्थितीतीत यावे.
  • हातांची पकड सोडून हाथ सरळ खाली करावे आणि डावा पाय उजव्या पायावरून खाली घेत पूर्वस्थितीत यावे.

 टिप – स्थूल व्यक्ति किवा ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी मांडि घालून हे आसन केले तरी चालेल.

 1
from google

गोमुखासन करण्याचे अनेक फायदे आहेत. गोमुखासन करण्याची पद्धत आणि फायदे पुढीलप्रमाणे . गोमुखासन करण्याची योग्य पद्धत बघितली आता जानुण घेऊया गोमुखासनाचे फायदे

गोमुखसनाचे फायदे

♦ गोमुखासनामुळे हातांचे, दंडाचे आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात.

♦ गोमुखासन स्त्रियांसाठी खूप महत्वचे आहे. वजन घटवण्यासाठी आणि शरीर अधिक सुंदर सुंदर बनवण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.

♦ दमा असणाऱ्यांसाठी हे आसन वरदान आहे तसेच श्वासासंबंधीत सर्व आजारांवर या आसनामुळे आराम मिळतो.

♦ या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसानची ताकद वाढते,  त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि आपल्याला अनेक अजरांपासून दूर ठेवण्यास मदत होते.

♦ बद्धकोष्टता आणि मूळव्याध या आजारांवर अटकाव आणण्यासाठी हे आसन उपयोगी आहे. नियमित हे आसन केल्यास हे आजार होण्यापासून आपण टाळू शकतो.

♦ गोमुखासनाच्या नियमित सरावामुळे स्वादुपिंड नेहमी उत्तेजित राहते त्यामुळे आपण मधुमेह सारख्या भयंकर आजारवर मॅट करू शकतो.

♦ या आसनाच्या नियमित सरावाने संधिवातासारख्या दुखण्यावर सुद्धा मात करू शकतो.

The Ultimate Guide To Doing gomukhasana Yoga Properly

गोमुखासन करताना घ्यावयाची काळजी

  1. गोमुखासन करताना दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफताना हाताला शक्य तितकाच ताण जास्त ताण देऊ नये.
  2. पाठीचा त्रास, संधिवात , मानदुखी , रक्ती मूळव्याध असेल तर हे आसन करू नये, किवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे .
  3. गर्भवती स्त्रियांनी पहिले तीन महीने हे आसन करू नये.
  4. हे आसन करण्याआधी स्वता:ला अनुभव असेल तर किवा प्रशिक्षकाच्या सल्ल्याने करावे.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही गोमुखासन करण्याचा विचार करू शकता. गोमुखासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

आसने करताना कोणती काळजी घ्यावी ?

गोमुखासन कैसे करे? इन हिंदी 

2 thoughts on “गोमुखासन करण्याची पद्धत आणि फायदे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *