virbhadrasana

भारतात अनेक वर्षापासून योगासनांच्या प्रचार आणि प्रसार केला जातो. योगासाधनेची कला ही प्रथम भारतात विकसित झाली आहे. पूर्वी महान योगासाधकांनी , महान योगी पुरुषांनी निसर्ग , धार्मिक कथेतील पात्र तसेच सृष्टीतील विविध गोष्टींच्या आधारे योगासने तयार केली. यात महान योगी पुरुषांचा मोलाचा वाटा आहे. चला तर जाणून घेऊया विरभद्रासन – Virbhadrasana in marathi मध्ये

असेच एक आसन आहे विरभद्रासन. या आसनाचे वर्णन हिंदू धर्मातील पौराणिक कथांमध्ये केला गेला आहे. भगवान शंकरांच्या कैलास पर्वताचे द्वारपाल प्रथम भूमीवर याच रूपात प्रकट झाले त्यावर विरभद्रासन नाव दिले गेले.

पूर्वी युद्धाची तयारी किवा मुलांना प्रशिक्षण देताना या आसनाचा बहुतेक वेळा उपयोग होत होता. हे आसन केल्याने शरीराला मजबूती , बळकटी मिळते म्हणून युद्धात या आसनाचा सराव केला जाई.

विरभद्रसन

 

विरभद्रासन म्हणजे काय?

विरभद्रासन या नावातच खूप काही सामावले आहे. विर – योद्धा , भद्र – शुभ्र , आसन – स्थिति . विरभद्रासनालाच योध्यानचे आसन असेही म्हंटले जाते.

विरभद्रासनालाच इंग्लिश  मध्ये worrior pose असे म्हंटले जाते. चला तर जाणून घेऊया विरभद्रासन – Virbhadrasana in marathi आणि त्याचे फायदे पुढीलप्रमाणे →

विरभद्रासन करण्याची योग्य पद्धत

 • प्रथम योगा मॅटवर ताडासन (mountain pose) मध्ये उभे रहा.
 • दोन्ही पायांमध्ये 3-4 फुट अंतर असू द्यावे.
 • उजवा पाय 90 अंशामध्ये बाहेरच्या बाजूस वळवा, आणि डावा पाय 15 अंशामध्ये वळवा.
 • उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मध्यभागी आहे का? याकडे लक्ष द्या.
 • दोन्ही हात उचलून सरळ वरती खांद्याच्या रेषेत आणावे. दोन्ही हात जमिनीला समांतर आहेत ना याकडे लक्ष द्यावे.
 • उजवा पाय थोडा गुडघ्यात वाकवून उजवीकडे मन वाळवून पहा.
 • हात अजून वरच्या दिशेला ताणले जातील याचा प्रयत्न करावा. (शक्य तितकाच ताण द्यावा)
 • कंबरेला वरच्या दिशेने दाब देऊन खाली दाबण्याचा हलकासा प्रयत्न करावा.
 • याच आसनात काही वेळ स्थिर असावे. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावा. श्वासोच्छवास चालू ठेवावा.
 • श्वास सोडत दोन्ही हात खाली आणा आणि पूर्वस्थितीला यावे.
 • अगदी अशाच प्रकारे डाव्या बाजूने आसनाचा सराव करावा.

विरभद्रासन करण्याचे फायदे

♦ शरीर संतुलित राहते व काम करण्याची क्षमता राहते.

♦ हात, पाय, पाठीचा कणा यांना लवचिकपणा येतो व ते अधिक कार्यक्षम बनतात.

♦ शरीरातला ताण थोड्याच आवधीमध्ये कमी करण्यास खूप उपयुक्त आसन आहे.

♦ जे नेहमी बसून काम करतात त्यांच्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.

♦ ताकदीसोबतच आत्मविश्वास वाढवण्यासाठीही मदत होते.

♦ टाचा, हिप्स, गुडघे यांना लवचिक बनवते.

वीरभद्रासन कैसे करे? जाणून घ्या हिंदी मध्ये

विरभद्रासन करताना घ्यावयाची काळजी

 1. गुडघ्याचा किवा पाठीच्या कण्याचा काही त्रास असल्यास हे आसन करताना प्रशिक्षकाच्या सल्ल्याने करावे.
 2. नुकतेच दीर्घ आजारातून बारे झाले असल्यास आसन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 3. गर्भधारणा असताना हे आसन करू शकता ,दुसऱ्या किवा तिसऱ्या तिमाहीमध्ये हे आसन केल्यास अनेक फायदे बघायला मिळतील पण आसन करताना भिंतीचा आधार घेऊन करावे. आणि आसन करताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
 4. संधिवात किवा अतिसार यांचा त्रास असेल तर आसन करू नये.

मित्रांनो आपल्या आयुष्यात विरभद्रासन किती महत्वाचे स्थान आहे हे आपण वरीलप्रमाणे बघितलेच आहे , या लेखात आपण विरभद्रासन करण्याची योग्य पद्धत,फायदे आणि काळजी विरभद्रासन – Virbhadrasana in marathi मध्ये वरीलप्रमाणे बघितले आहे. योगासनांच्या योग्य पद्धतीचा वापर करून आपण आपले शारीरिक आणि मानसिक स्वस्थ सुधारूया.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही सुखासन करण्याचा विचार करू शकता.  सुखासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

Advanced Virabhadrasana poses to deepen your experience

3 thoughts on “विरभद्रासन – Virbhadrasana in marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *