वज्रासन

वज्र हे बळकट आणि शक्तिशाली असते. वज्रासन हे एकमेव असे आसन आहे की ते आपण जेवण केल्यानंतर करू शकतो. वज्रासन हे सर्व आसनांपैकी सोपे आणि प्रभावी आसन आहे, ते आपण वयाच्या कोणत्याही वर्षी करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घेऊ वज्रासन – vajrasana in marathi मध्ये ⇒

vajrasana 1

The Ultimate Guide To Doing Vajrasana For Beginners.

वज्रासन करण्याची पद्धत

  • प्रथम दोन्ही पाय पसरून खाली बसावे आणि हाथ नितंबाच्या बाजूला ठेवावे.
  • डाव्या बाजूला शरीर झुकवून डाव्या हातावर शरीराचा भार देऊन उजव्या पायाचा पंजा पकडून पाय गुडघ्यात वळवून पंजा आकाशाच्या दिशेला येईल अशा स्थितीत वाळवावे.
  • हिच कृती उजव्या बाजूला शरीर झुकवून डाव्या हातावर शरीराचा भार देऊन डाव्या पायाचा पंजा पकडून पाय गुडघ्यात वळवून पंजा आकाशाच्या दिशेला येईल अशा स्थितीत वळवावे.
  • या स्थितीत असताना टाच बाहेर व बोटे आत आणि नितंब दोन्ही टाचांच्या मध्ये ठेवून नीट बसावे.
  • गुडघे जुळवून बसावे व हाताची पंजे गुडघ्यावर ठेवावे किवा नमस्कार स्थितीत असावे.
  • पाठीचा कणा ताठ ठेवावा.
  • पोट किंचित आत आत घेऊन श्वासोच्छवास चालू ठेवावा.
  • सुरुवातीला हे आसन करताना काही सेकंदच आसन करावे. नियमित सराव झाल्यास तुम्ही हे आसन 1-3 मिनिटे किवा त्यापेक्षा जास्त वेळही  करू शकता.
  • पूर्वस्थितीला येताना हळूच शरीराचे वजन वरती उचलून शरीर उजव्या बाजूला झुकवून डावा पाय सरळ करावा आणि नंतर उजव्या पाय सरळ करून पूर्वस्थितीत यावे.

vajrasana

वज्रासनाचे फायदे

♦ गॅसमुळे निर्माण होणारे अनेक विकार वज्रासनामुळे बरे होतात.

♦ वज्रासनाचा नियमित सराव केल्यास जठरात तयार होणाऱ्या पाचकरसाचे प्रमाण चांगले वाढते त्यामुळे जठराची कार्यक्षमता वाढून पचन क्रियेस मदत होते.

♦ वज्रासन केल्यास पाय, जननेंद्रिय ,गुडघे यांचे आरोग्य वाढून ते मजबूत होतात.

वज्रासन करताना घ्यावयाची काळजी वज्रासन – vajrasana in marathi मध्ये पुढील प्रमाणे दिले आहे

वज्रासन करताना घ्यावयाची काळजी

  1. ज्यांना सरळ बसून गुडघ्यात पाय वाकवून आसन करणे जमत नसेल त्यांनी गुडघ्यावर उभे राहून टाचा बाहेर बोटे आत वळवून नितंब टाचांच्या मध्ये ठेवावे. जेणेकरून तुम्हाला त्रास होणार आहे.
  2. वज्रासन हे आसन शरीराला शक्य होईल इतका वेळच करावे जास्त ताण देऊ नये,नियमित सरवामुळे ते सहज शक्य होईल.
  3. सुरुवातीला या आसनाचा किंचित त्रासही होतो पण नियमित सराव केल्यास हे तुम्हाला सहज जमते.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही वज्रासन करण्याचा विचार करू शकता. वज्रासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर, लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

वज्रासन हिन्दी मै (vajrasana pose in hindi)

2 thoughts on “वज्रासन – vajrasana in marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *