वक्रासन माहिती मराठी

वक्रासन हे बैठे आसन प्रकारातील एक आसन आहे. वक्रासन केल्याने अनेक शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर जाऊन घेऊया  वक्रासन माहिती मराठी  मध्ये ⇒

vakrasana

वक्रासन म्हणजे काय ?

वक्र म्हणजे “वाकडा “, वक्रासन करताना शरीराचा आकार हा वाकडा किवा शरीराला या आसनाच्या मदतीने मेरूदंडास पीळ दिल जातो म्हणून याला वक्रासन म्हणतात.

वक्र हा शब्द संस्कृत मधला आहे. वक्रासन हे करायला खूप सोपे आहे , आणि  कितीही वयाची व्यक्ति हे आसन करू शकते.

वक्रासन करण्याची पद्धत

  • वक्रासन करताना प्रथम जमिनीवर पाय सरळ लांब करून बसावे.
  • उजवा पाय गुडघ्यात वाकवून पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्या जवळ पलीकडच्या बाजूला ठेवावे , आणि उजवा गुडघा सरळ उभा करून ठेवावा.
  • उजव्या हाथ 6-9 इंच इतक्या अंतरावर पाठीमागे ठेवावा आणि कोपरात सरळ ठेवावा.
  • त्यानंतर डावा हाथ उजव्या पायाच्या पलीकडे ठेवावा.
  • हाथ खाली टेकत असेल तरच टेकवावा नाहीतर अधांतरी ठेवावा किवा उजव्या गुडघ्यावर ठेवावा आणि मान उजव्या बाजूने पाठीमागे वळवावी.
  • या आसन स्थितीत साधारण 1-3 मिनिटे थांबावे.
  • नंतर मान सरळ करावी, डावा हाथ काढून घ्यावा उजवा पाय सरळ करावा आणि पूर्वस्थितीत यावे.
  • हेच आसन परत डाव्या बाजूने करावे.
vakrasana
from google

वक्रासनाचे फायदे

♦ वक्रासन केल्यास मानेचे दुखणे बरे होते.

♦ शरीर निरोगी राहते.

♦ वक्रासन केल्यामुळे किडनी , मूत्रपिंड यासारखे आजार कमी व्हायला मदत होते.

♦ वक्रासन केल्याने माणक्याचे त्रास बरे होतात.

How To Do The Vakrasana Yoga Pose: A Step-By-Step Guide

वक्रासन माहिती मराठी मध्ये आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते पुढील प्रमाणे दिले आहे जेणेकरून आपल्या शरीरावर आसने करताना चुकीचा परिणाम होणार नाही.

वक्रासन करताना घ्यावयाची काळजी

  1. पोट आणि कमरेचा त्रास असलेल्यांनी प्रशिक्षकाचा सल्ला घेऊनच आसन करावे.
  2. आसन करताना डावा हाथ जमीनिवर टेकवता येईल तेवढाच प्रयत्न करावा , जास्त ताण देऊ नये.

 

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही वक्रासन करण्याचा विचार करू शकता. वक्रासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

 

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

वक्रासन कैसे करे? हिंदी मै

2 thoughts on “वक्रासन माहिती मराठी”

Leave a Comment