Yoga in Marathi (योग म्हणजे काय ?)

Yoga in Marathi योग म्हणजे काय ?

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात Yoga in Marathi योग म्हणजे काय ? आणि योगाचे फायदे याबद्दलची  माहिती जाणून घेणार आहोत . योगा ही एक कला आहे आणि विज्ञान सुद्धा ! आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टीने निरोगी असाल तरच  आपण आनंदी आयुष्य जगू शकतो.  आपल्या सर्वांनाच माहित आहे निरोगी शरीराचा अर्थ म्हणजे रोगमुक्त शरीर असा नसतो तर,योग्य आहार आणि योग्य वजन याचबरोबर मानसिक संतुलन देखील गरजेचे आहे .म्हणून आजच्या  युगात योगाला  खूप महत्व आहे .

चला तर मग जाणून घेऊया Yoga in Marathi योग म्हणजे काय ?

yoga in marathi (योग म्हणजे काय ?)

योगा म्हणजे शरीराचे अवयव ,मनातील भवना  आणि अध्यात्म यांचा संयोग  करणे होय.

योगामुळे  शारीरिक आणि मानसिक तनाव दूर होऊन शरीरातील नाड्यांचे शुद्धीकरण होते .

आपल्या दैनंदिन जीवनात योगाचे खूप महत्व आहे .योगा हा मानसाला दीर्घायुषी  बनवतो.आजच्‍या धावपळीच्या  युगात आपल्‍याला आपल्‍या शरिराकडे लक्ष देण्यासाठी  पुरेसा वेळ  मिळत नाही.त्‍यामुले शारिरिक आणि  मानसिक स्वास्थ्याकडे  पूर्ण;ता दुर्लक्ष होते,पण योगामुळे आपण  ही कमतरता  भरुन काढू  शकतो .

आपले शरिर योग्य प्रकारे संतुलित,सुंदर,निरोगी ठेवण्यासाठी  रोज योगासने करणे गरजेचे आहे.  योगा  हा फक्‍त व्यायाम  पर्यंत सिमित नसून त्‍याच्‍या खूप संक्षिप्त  अर्थ काढलेला  आहे.त्‍यामध्‍ये असे संगितले जाते की,आपला आत्मा परमात्मा याशी  विलिन होतो .योगा  साधना करत असताना आपण  हे विश्व सोडुन दुसरे विश्व, ब्रह्मांड आपल्याला योग ध्यानात दिसते . बहुतेक ऋषीमुनींना  सिद्धीया ध्यान-धारणेमुळेच  प्राप्त झाले आहेत.

योगाचा इतिहास-

योग ही एक प्राचीन अध्यात्मिकआणि शारीरिक  शास्त्रं आहे, ज्याचा भारतात उगम झाला. ही एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शिस्त आहे जी हजारो वर्षांपूर्वी आत्मज्ञान आणि आंतरिक शांती मिळविण्यासाठी उद्भवली.योगा  या शब्दातच खूप काही आहे.योगा पाच हजार वर्षा पूर्विचा इतिहास आहे.

योगा  हा शब्द संस्कृत शब्द ‘युग’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘एकत्रित होणे किंवा एकत्र येणे.’ योगामागील मूळ कल्पना म्हणजे आपले शरीर, मन आणि आत्मा एकत्र करून शांतीची स्थिती शोधणे.

योगामध्ये 100 पेक्षा जास्त विविध शैलींचा सराव केला जातो. हे सिंधू खोऱ्यातील सभ्यतेमध्ये  सापडते जेथे ते आध्यात्मिक पद्धतींसाठी एखाद्याचे शरीर युद्धासाठी तयार करण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वापरले जात होते.

दुसऱ्या शब्दांत, तुम्ही तुमच्या शरीरावर आणि मनावर नियंत्रण मिळवून तुमच्या जीवनात संतुलन आणण्याचा प्रयत्न करत आहात.पूर्वच्य काली अनेक  ऋषिमुनिंनी योगा  साधनेद्वार तपश्चर्या करुण बौद्धिक वा अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती करून  घेतली .

आंतरराष्ट्रीय योगा दिवस –

अंतरराष्ट्रीय योगा  दिवस 21 जून ला सजरा केला जातो.21 जून 2015 ला पहिल्यांदा श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र सभेला दिलेला प्रस्ताव मंजूर झाला आणि तेंव्हापासून 21 जून हा दिवस अंतर राष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो .हा दिवस वर्षातुन खुप मोठा दिवस मनला जातो.

A Simple Guide To What is Yoga And How Does It Help?

योगाचे फायदे

  • योगासनांचे आपल्या  आयुष्यात खुप महत्वाचे स्थान अहे. योगा  चा नियमीत सराव केल्यास  हाड ,मास ,आणी पेशी मजबुत होतात  व  लठ्ठपणा नाहीसा होतो .
  • नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढते .
  • मानसिक ताण -तणाव दुर होतो .
  • मन आनंदी आणि सकारात्मक राहते .
  • योगाने रोगप्रतिकरक शक्ति सुधारते .
  • अपचन ,गॅस यांसारख्या समस्यांपासून सुटका होते .
  • आत्मविश्वास वाढतो .
  • आंतरिक शक्ति वाढते .
  • उच्च रक्तदाब ,मधुमेह ,पाठीचा आणि मणक्याचा त्रास यांसारख्या गंभीर आजारवर देखील मत करू शकतो .
  • तुम्हाला महित आहे का?बहुतेक रोग,  तस म्हंटल तर ७०% रोग हे योगा , ध्यान व योगासने केल्यने बरे होतात .मनवाची इच्छाशक्ती एवढी मजबुत असेते की ठरवल  ते पूर्ण करू शकते ,.म्हणून इच्छाशक्ती योग आणि योगासने केल्यने वाढते .योगा  हा आपल्या जीवनातील अनमोल भाग आहे . योगासने केल्यने शरीर तंदुरुस्त राहते,मन शांत रहाते, आणि म्‍हणून आपन दैनंदिन जीवन व्‍यावस्‍ती व्‍यातित करू शकतो.

शास्त्रशुद्ध पद्धतीने योगा शिकवणाऱ्या पुरुषांना  योगी असे म्हंटले जाते आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने योगा शिकवणाऱ्या महिलांना योगिनी म्हंटले जाते.

अजून पुढील काही माहितीसाठी जनिये योग क्या है? yoga in hindi विझिट करत राहा

Related Posts

3 thoughts on “Yoga in Marathi योग म्हणजे काय ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *