बालासन – Balasana in marathi

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला रोज योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे. त्यासाठी बालासन – Balasana in marathi मध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

बालासन ही अनेक योगासनांमध्ये एक आवश्यक मुद्रा आहे. ही एक सौम्य परंतु शक्तिशाली पोझ आहे जी इतर आसनांची तयारी करण्यासाठी किंवा जोरदार सरावानंतर आराम आणि पुनर्संचयित करण्यासाठी वापरली जाऊ शकते. बालसनाचा इतिहास अनेक संस्कृती आणि भौगोलिक प्रदेशांमध्ये अनेक शतकांपूर्वीचा आहे.

बालासन

बालासन म्हणजे काय ?

बालासनाला इंग्लिश मध्ये child pose (चाइल्ड पोज ) असे म्हणतात. हे आसन करण्यास लहान बालकांना नक्कीच प्रेरित करावे कारण हे आसन लहान बालकांना सहज करण्याइतके सोपे आहे. हे आसन गर्भात असलेल्या बालकाप्रमाणे भासते.

तसेच बालासन केल्याने मानसिक स्वस्थ सुधारण्यास मदत होते व स्मरण शक्ति वाढवण्यास हे आसन खूप महत्वाचे आहे. लहान मुलांचे वाढते वय असल्याने त्यांना ह्या आसनाच्या मदतीने स्मरण शक्ति वाढवणे सहज शक्य होते.

बालासन करायला सोपे असले तरी , त्याचे फायदे अनेक आहेत. चला तर जाणून घेऊया बालासन करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे →

balasana

बालासन करण्याची पद्धत

  • बालासन करताना प्रथम चटई अंथरूण वज्रासनात बसावे.
  • पाठीचा कणा ताठ ठेवावा,आणि शरीर समोरच्या बाजूला झुकवावे.
  • दीर्घ श्वास घेऊन मस्तक जमिनीला टेकेल एवढे कमरेत वाकावे.
  • दोन्ही खांदे एकमेकांना समांतर ठेऊन हाथ समोरच्या बाजूला आकृतीत दाखवल्याप्रमाणे ठेवावे.
  • आसन करत असताना श्वासोच्छवास नॉर्मल चालू असावा.
  • 2-3 मिनिटे या आसन स्थितीत थांबावे. (किवा शक्य होईल तितका वेळ)
  • श्वास सोडून परत पूर्वस्थितीत  यावे.

बालासन करण्याचे फायदे

♦ बालासन या आसनाच्या नियमित सरावामुळे मज्जासस्थेचे कार्य सुधारते व मेंदूला भरपूर रक्तपुरवठा मिळून मेंदू संबंधीच्या अनेक समस्यांचे निवारण आपण करू शकतो.

♦ या आसनाच्या नियमित सरावामुळे बद्धकोष्टता सारख्या समस्या दूर होतात.

♦ बालासनाच्या सरावामुळे पाठीच्या कण्याला ताण पडल्यामुळे व्यायाम मिळून पाठ आणि कमरेच्या संबंधित अनेक समस्या दूर होतात.

♦ बालासन केल्याने शरीर आणि मन शांत राहते.

♦ या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठ , कंबर , खांदे , यांचे स्नायू मजबूत आणि लवचिक होतात.

 

हिंदीमध्ये माहितीसाठी विजिट करा बालासन कैसे करे ?

बालासन करताना घ्यावयाची काळजी

  1. गरोदर स्त्रियांनी बालासन करू नये.
  2. बालासन करण्याआधी पोट साफ असायला हवे.
  3. बालासन करताना मस्तक जमिनीला टेकत असेल तरच टेकवावे जास्त ताण देऊ नये.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही बालासन करण्याचा विचार करू शकता.  बालासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

The Best Way To Do Balasana Yoga: Step-By-Step Instructions

Related Posts

One thought on “बालासन – Balasana in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *