pacchimottanasan

पूर्वोत्तानासन ही योगाची एक विशेष आसन आहे ज्याच्यामागे खूप आरोग्यदायक फायदे आहेत. तो खूप सोप्या प्रकारे केला जाऊ शकतो, आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अद्वितीय लाभ पुरवतो. या लेखात, आपल्याला पूर्वोत्तानासनच्या महत्वाच्या गोष्टी, त्याच्या कसे करावे, आणि त्याचे कुठले आरोग्यदायक फायदे मिळतात, हे सर्व सोप्या भाषेत वाचायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया पूर्वोत्तानासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे.

पूर्वोत्तानासन म्हणजे काय ?

पूर्व म्हणजे “पूर्व दिशा” किवा  “शरीराचा वरचा भाग”आणि उत्तान म्हणजे “ताणलेला भाग”. पूर्वोत्तानासनाला इंग्लिश मध्ये अप्पर प्लॅनक पोज (upper plank pose) म्हणतात . हे आसन करायला खूप सोपे आहे आणि त्याचे फायदे अनेक आहे.

पूर्वोत्तानासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे
from google

आजच्या धकाधकीच्या जीवणात शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे शारीरिक , श्वासणासंबंधीत आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

हे आसन नियमित केल्यास त्याचे अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतील. चला तर जाणुन घेऊया पूर्वोत्तानासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पूर्वोत्तानासन करण्याची योग्य पद्धत

 • पूर्वोत्तानासन करताना प्रथम योगा मॅट वर पाय समोर सरळ लांब करून बसावे.
 • पाय एकमेकांना जुळवून पाठ ताठ असावी.
 • त्यानंतर नितंब आणि खांदे यांना हाथ समांतर खाली घेऊन तळहात जमिनीवर ठेवावे. हातांची बोटे बाहेरच्या बाजूला असावी.
 • शरीर पाठीमागे झुकून , हातांवर हळू – हळू शरीराचे वजन देत शरीर वरच्या दिशेने उचलावे.
 • गुडघे ताठ करून पाय आणि पायाची बोटे जमीनिवर सरळ जमिनीवर टेकवा. डोक्याच्या मागच्या भागाला जमीच्या बाजूला जाऊ द्यावे.
 • ह्या स्थितीत असताना श्वसनक्रिया नियमित चालू ठेवावी .
 • ह्या आसन स्थितीत असताना  1-3 मिनिटे किवा सुरुवातीला शक्य होईल तितका वेळ थांबावे.(जास्त ताण देऊ नये)
 • त्यानंतर पाय आणि शरीराचा भाग हळू – हळू खाली घेत पूर्वस्थितीत यावे.
 • बोटांची दिशा बदलून म्हणजेच आतल्या बाजूला घेऊन परत आसनाची पुनरारुत्ती करावी.
purvottanasan
google

पूर्वोत्तानासन करण्याचे फायदे

♦ नियमित पूर्वोत्तानासन केल्यास श्वासणासंबंधित अनेक समस्यांचे समाधान होते व श्वसनसंस्था सुधारते.

♦ पाठीचा कणा , पाठ , मनगटे , हात , खांदे  मजबूत होतात.

♦ पोटातील अवयवांना ताण पडल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते व पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.

♦ पाय व नितंबाचा व्यायाम होतो.

♦ पूर्वोत्तानासन थायरॉईड ग्रंथिणा उत्तेजित करते.

The Benefits of Practicing Purvottanasana Yoga

पूर्वोत्तानासन करताना घ्यावयाची काळजी

 1. पूर्वोत्तानासन करताना शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक जोर लाऊ नये, शक्य होईल तितकाच ताण द्यावा.
 2. शरीराला काही दुखापत असेल तर पूर्वोत्तानासन करू नये किवा प्रशिक्षकाचा सल्ला घेऊनच करावे.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही पूर्वोत्तानासन करण्याचा विचार करू शकता. पूर्वोत्तानासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

पूर्वोत्तानासन – purvottanasana इन हिंदी

2 thoughts on “पूर्वोत्तानासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *