पश्चिमोत्तानासान – Paschimottasana in marathi

पश्चिमोत्तानासान – Paschimottasana in marathi  हे बसून केल्या जाणाऱ्या आसन प्रकरांपैकी एक आसन आहे. पश्चिमोत्तनासन, हे एक प्रदीर्घ आणि समृद्ध इतिहास असलेले उत्कृष्ट योग आसन आहे. हे 15 व्या शतकातील हिंदू ग्रंथ, हठयोग प्रदीपिका मध्ये प्रथम वर्णन केले गेले होते आणि तेव्हापासून सर्व स्तरातील योगींनी त्याचा मोठ्या प्रमाणावर सराव केला आहे.

paschimottanasan

पश्चिमोत्तानासान म्हणजे काय?

पश्चिमोत्तानासान या नावातच ‘पश्चिम’ आणि ‘उत्तान’ या दोन शब्दांचा संयोग आहे. यात ‘पश्चिम दिशा’ असा अर्थ न घेता पाठीचा माघचा भाग असा घेतला आहे. पश्चिम म्हणजे पाठीचा मघचा भाग आणि उत्तान म्हणजे ‘ताणलेला’ म्हणून त्यास पश्चिमोत्तानासान असे म्हंटले जाते.

पश्चिमोत्तानासानाचा सराव करताना शरीराच्या मागच्या भागात म्हणजेच मणक्यामध्ये ताण येतो. पश्चिमोत्तानासान जरी सोपे वाटत असले तरी करायला थोडे अवघड असल्याने प्रशिक्षकाचा सल्ला घेऊनच करावे. चला तर जाणून घेऊ पश्चिमोत्तानासान – Paschimottasana in marathi मध्ये

पश्चिमोत्तानासान करण्याची योग्य पद्धत

 • पश्चिमोत्तानासान करताना प्रथम मॅटवर दोन्ही पाय सरळ लांब करून बसावे. दोन्ही पायांमध्ये अंतर नसावे.
 • पाठीचा कणा , मान आणि नजर ताठ असावी.
 • आता दीर्घ श्वास घेऊन ,शरीर थोडे पुढे झुकवून पाय गुडघ्यात न वाकवता पायाची बोटे किवा पायाचे पंजे पकडण्याचा प्रयत्न करा.
 • गुडघे सरळ ठेऊन कपाळ गुडघ्याना टेकवण्याचा प्रयत्न करा.
 • खांद्यांमद्धे वाकवून कोपर जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
 • श्वास सोडून द्यावा, शरीर शिथिल करावे  आसनस्थितीत काही वेळ रहा.
 • काही सेकंदानंतर परत पूर्वस्थितीत या.
 • हेच आसन साधारण 3-4 वेळेस करा.

पश्चिमोत्तनासान

पश्चिमोत्तानासान करण्याचे फायदे

♦ पश्चिमोत्तानासान (paschimottasana) करताना पाठीचा कणा भरपूर ताणला जातो , त्यामुळे पाठीची हाडे लवचिक आणि मजबूत होण्यास मदत होते.

♦ पोट आणि ओटीपोट  यांवर दाब पडतो,त्यामुळे गॅसेस किवा पोटसंबंधी समस्या दूर होतात.

♦ स्त्रियांसाठी ,मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा व्यक्तींसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.

♦ पश्चिमोत्तानासानाच्या नियमित सरावामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते, तसेच स्त्रियांच्या अनियमित मासिक पाळी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

♦ मनाची चंचलता कमी होते व एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते.

♦ पश्चिमोत्तानासानाचा योग्य पद्धतीने सराव केल्यास पोटाचे व पाठीचे स्नायू ताणले जातात त्यामुळे त्या भागातली चरबी कमी करण्यास या आसनाची मदत होते.

पश्चिमोत्तानासान करताना घ्यावयाची काळजी

 1. पाठीच्या कण्याचे दुखणे असणाऱ्यांनी हे आसन करू नये.
 2. बद्धकोष्टता , हर्निया इत्यादि विकार असलेल्यांनी हे आसन करू नये.
 3. आसन करताना जबरदस्ती करू नये, शक्य तितकाच ताण द्यावा. कारण अवयवांना जास्त ताण दिल्यास हाडे किवा अवयवांना दुखापत होण्याची शक्यता असते.
 4. हे आसन शक्यतो माहिती असेल तर किवा प्रशिक्षकाचा सल्ला घेऊनच करावे.

The Ultimate Guide To Doing Paschimottanasana: Everything You Need To Know

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही पश्चिमोत्तानासान करण्याचा विचार करू शकता. पश्चिमोत्तानासान योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

अधिक माहितीसाठी जाणून घ्या हिंदीमध्ये पश्चिमोत्तानासन – Paschimottanasan in hindi

1 thought on “पश्चिमोत्तानासान – Paschimottasana in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *