
नटराजासन – Natrajasan in marathi
नटराज आसनाचे अनेक फायदे आहे ,ह्या मुद्रेमुळे जीवनात शांतता प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया नटराजासन – natrajasan in marathi बद्दल →
हे एक लाभदायक आसन आहे. ज्याला भगवान शिवशंकर यांचे नाव देण्यात आले आहे. भगवान शंकरांची ही आवडती मुद्रा होती, शिवशंकरांनी नटराज स्वरूपात सादर केलेल्या नृत्यात त्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
नटराज आसन करत असताना आपल्या शरीराचा आकार नटराज स्वरूपात सादर केलेल्या मुद्रेप्रमाणे दिसते म्हणून याला नटराजासन म्हणतात .
Table of Contents
नटराजासन कसे करावे?
- नटराजसान करताना प्रथम चटईवर ताडासनामध्ये उभे राहावे.
- त्यानंतर डाव्या पायावर शरीराचा सर्व भार देऊन तोल सांभाळण्याचा प्रयत्न करावा.
- दीर्घ श्वास घेऊन ,उजवा पाय गुडघ्यात वाकवून नितंबाच्या पाठीमागच्या बाजूने वर घ्यावा व उजव्या हाताने उजव्या पायाचा पंजा पकडून शक्य तितका ताण देऊन पाय वर न्यावा.
- शरीराचा भार डाव्या पायावर देऊन डावा हाथ समोरच्या दिशेने सरळ करावा.
- ह्या स्थितीत सुरुवातीला 20-30 सेकंद थांबावे. नियमित सराव आसल्यास जास्त वेळ केले तरी चालेल.
- ह्या स्थितीत श्वासोच्छवास संथ (नॉर्मल )असावा.हे आसन शक्यतो डोळे उघडे ठेवूनच करावे आणि आपले लक्ष श्वासावर केंद्रित असावे.
- परत पूर्वस्थितीत येताना दीर्घ श्वास घेऊन उजव्या पायाची हाताची पकड सोडवावी व गुडघ्यात वाकवलेला पाय सावकाश खाली जमिनीवर घ्यावा.
- त्यानंतर डावा हाथ खाली घ्यावा व दोन्ही पायांवर समान वजन द्यावे.
- हेच आसन परत उजव्या पायाने करावे आणि आसन पूर्ण करावे.
- नटराजासन दोन ते तीन वेळा करावे.
How To Do The Natarajaasana: A Guide For Beginners
नटराजासन करण्याचे फायदे
♦ नटराज आसनाचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शरीर आणि मनाची एकाग्रता वाढते त्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते.
♦ नियमित सरावामुळे पाय, हाथ, नितंब, गुडघे,घोटे आणि खांदे यांची लवचिकता वाढते.
♦ नटराजासन हे आपले शरीरातील समग्र सुंदरता वाढवते. या योगासनामुळे आपले शरीर तात्काळीनपणे लागते आणि सुंदर दिसते.
♦ नटराजासन हे आपले शरीर स्थिर करते आणि त्याची बॅलेन्स सुधारते. या योगासनातील स्थितीत रहाणे आपल्या माध्यमिकाची क्षमता वाढवते.
♦ श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे कार्य सुधारण्यास मदत होते.
♦ पायातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते.
नटराजासन करताना घ्यावयाची काळजी
- हे आसन करताना शरीराचा तोल सांभाळणे खूप महत्वाचे आहे म्हणून आसन करताना लक्षपूर्वक करावे.
- तीव्र सांधेदुखी ,हृदयरोग ,उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे आसन करणे टाळावे किवा प्रशिक्षकाचा सल्ला घेऊनच करावे.
- मासिक पाळी दरम्यान किवा गरोदर असताना हे आसन करू नये.
- नटराज आसन करताना श्वासोच्छवास कृतीत दिल्या प्रमाणे करावा.
निष्कर्ष
तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही नटराजसान करण्याचा विचार करू शकता. नटराजसान योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?
कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.
[…] नटराजासन (natrajasan in marathi) […]
[…] नटराजासन – Natrajasan in marathi […]