त्रिकोणासान – Trikonasana

त्रिकोणासान – Trikonasana करत असताना आपल्या शरीराचा आकार गणितातील त्रिकोणासारखा होतो म्हणून या आसनाला त्रिकोणासान म्हंटले जाते. त्रिकोणासान – Trikonasana ही मुद्रा शरीराला एकाच वेळी तीन वेगवेगळ्या कोणात आणून ठेवते आणि संपूर्ण शरीराचे सामान्य कार्य चांगले ठेवयास मदत करते.

बसून काम केल्याने अति वजन आणि कमरेसंबंधीत अनेक समस्यांचा सामना आजकाल करावा लागतो आहे. बैठे कामामुळे पचणाबंधीत  अनेक समस्या सतावत असतात. त्रिकोणासनामुळे आपण ह्या सर्व समस्यांवर मात करू शकतो.

त्रिकोणासान करण्याची योग्य पद्धत,खबरदारी आणि त्याबद्दल चे फायदे त्रिकोणासान – Trikonasana आपण या लेखात बघणार आहोत.

trikonasan

 

त्रिकोणासान करण्याची पद्धत

 

 • प्रथम योगा मॅटवर सावधान स्थितीत उभे राहावे.
 • दोन्ही पायामध्ये तीन ते चार फुट एवढे अंतर असावे,किवा जेवढा पायाला ताण देता येईल तेवढे अंतर ठेवावे.
 • उजवे पाऊल ९० अंशामध्ये उजवीकडे वळवावा.
 • हे करत असताना उजव्या पायाची टाच आणि डाव्या पावलाचा कमानी भाग एका रेषेत असावा याकडे लक्ष द्या.
 • शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान असेल याकडे लक्ष असावे.
 • दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ जमिनीला समांतर ठेवत सावकाश उजवा हात उजव्या बाजूला जमिनीकडे तर डावा हात आकाशाच्या दिशेला खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावा.
 • शरीर समोरच्या दिशेला न झुकता कमरेत उजव्या बाजूस शक्य तितके वाकवून, उजव्या हाथ उजव्या पायाच्या घोट्यावर किवा उजव्या पावलाच्या मागच्या बाजूस ठेवावे.
 • डावा हाथ आकाशाच्या दिशेने सरळ ठेवत छातीच्या दिशेने तणावा आणि नजर वरती डाव्या हाताच्या तळव्यावर असावी.
 • नजर स्थिर असावी. दोन्ही गुडघे ताठ असावे,आणि लक्ष केंद्रित असावे.
 • श्वासोच्छवास संथ ठेवून लक्ष श्वासावर केंद्रित ठेवावे.
 • नंतर दीर्घ श्वास घेऊन शरीर सावकाश उजव्या बाजूने वरती घ्यावे. आणि परत पूर्वस्थितीत यावे.
 • नंतर डावा पाय ९० अंशात डावीकडे वळवावा आणि वरील कृती परत करा.

त्रिकोणासन की उचित विधि, सावधानिया और इसके लाभ

त्रिकोणासनाचे  फायदे

 

♦ बसून कामामुळे पोट ,ओटीपोट आणि मांड्या ही चरबी कमी करण्यास मदत होते .

♦ छाती ,गुडघे,हाथ ,पाय आणि घोटे यांमध्ये बळकटी येते.

♦ मांड्या , सांधे ,स्नायू ,पाठीचा कणा आणि माकड हाड लवचिक होतात.

♦ त्रिकोणसनाचा अभ्यास नियमित केल्यास वतामुळे होणारे त्रास कमी होण्यास मदत होते व कालांतराने ते उद्भवतच नाहीत.

♦ अकारण भीती अशा समस्यांपासून सुटका होते.त्यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन टिकून ठेवण्यास मदत होते.

त्रिकोणासान करताना घ्यावयाची काळजी

 

 • मानदुखी ,पाठदुखी आणि जुलाब असणाऱ्यांनी हे आसन करू नये .
 • कमी रक्तदाब ,सायटिका असणाऱ्यांनीसुद्धा हे आसन करणे टाळावे किवा प्रशिक्षकाच्या सल्ल्याने करावे.
 • उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे आसन हाथ वर नेऊन ताण न देता खाली ठेवून केले तरी चालेल.

 

श्वास घेण्याची पद्धत

 • आसन करताना श्वासोच्छवास नॉर्मल असावा.
 • पूर्वस्थितीत येताना दीर्घ श्वास घेऊन शरीर परत पूर्वस्थितीत आणावे.

निष्कर्ष

तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही त्रिकोणासान – Trikonasan करण्याचा विचार करू शकता. त्रिकोणासान योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?

कोणत्याही आसनाचा सराव करण्यापूर्वी त्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेणे आवश्यक आसते अन्यथा आसनाचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळत नाही.

To Know more about this in English Visit Sillpharma.com

 

 

2 thoughts on “त्रिकोणासान – Trikonasana”

Leave a Comment