Table of Contents
आसने करताना घ्यावयाची काळजी –
योगाभ्यास करत असताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे . योगा क्लास ला जाण्यापूर्वी किंवा नव्यान योगा शिकत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेण गरजेच आहे.म्हणून आसने करताना कोणती काळजी घ्यावी ? हे पुढीलप्रमाणे
काय करावे
♦ योगासने करत असताना स्वच्छ आणि आरामदायक मॅट किंवा चटई चा वापर करावा.
♦ योगासने करताना स्वच्छ आणि आरामदायक कपडे घालावे ,जेणेकरून तुम्ही व्यवस्तीत योगासने करू शकता .
♦ एक नॅप्किन किंवा रुमाल सोबत ठेवावा.
♦ महिलांचे अथवा पुरूषांचे केस लांब असतील तर रबरबॅन्ड चा वापर करावा,जेणेकरून योगासने करत असताना अडथळा येणार नाही .
♦ सोबत एक स्वच्छ पाणी बॉटल सोबत ठेवावी .
♦ रिकाम्या पोटी योगासने करून त्यानंतर अर्ध्या तासाने जेवणे हा पर्याय अवलंबू शकतो
♦ काही जणांना योगा करत असताना त्रास होतो, त्यांनी आपल्या प्रशिक्षकाचा सल्ला घेऊनच योगासने करावी .
♦ योगासने करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे,तुम्ही ते मोकळ्या वातावरणात केली पाहिजेत. कोंदट किंवा आपुऱ्या जागेत आसने करू नये . पण सगळ्यांनाच ते शक्य नसल्यामुळे कमीतकमी ती रूम स्वच्छ, शांत व भरपूर सूर्यप्रकाश आत येत असेल आशा ठिकाणी असावी. उन्हाळ्यात तुम्ही बाल्कनीत किंवा बागेत योगा केल्यास उत्तम.
♦ आसन करत असताना श्वासोच्छवास चालू ठेवावा जिथे सूचना केली असेल त्याठिकाणीच श्वास रोखावा.
♦ योगा सकाळी उपाशीपोटी करावा आणि पोट साफ झाल्यानंतर करवा. त्याचे खूप चांगले परिणाम मिळतात.
♦ नॉर्मल डिलीवरी नंतरचे तीन महीने आणि सिजेरियन नंतरच्या सहा महिन्यांनी आसने करावी .
♦ सुरुवातीला 20 मिनिटे योगा करणे तुमच्या शरीराला योग्य ठरते. पण तुम्ही नियमित योगा करत असेल तर अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ योगा करू शकता तुमच्या शरीराला सुट होईल एवढ.
♦ आसनाच्या सुरुवातीला व शेवटी शवासण करावे.प्रत्येक आसनाच्या शेवटी शवासणाची गरज नाही पण तरीही खूप दमल्यासारखे वाटत असेल तर शरीर शिथिल करण्यासाठी शवासण करावे.
Things to keep in mind while doing yoga
काय करू नये
♦ योगा करत असताना मध्येच थांबून पाणी पिऊ नये. असे केल्यास सर्दी ,कफ अथवा अन्य समस्यांचा सामना करावा लागेल.पण जर योगासने करताना सतत तहान लागत असेल तर घोट घोट पाणी प्यावे एकदम पाणी पिऊ नये. फ्रीज मधील पाणी पिणे टाळावे.
♦ काहींना योगा करताना सुरुवातीला त्रास होतो,त्यांनी सुरुवातीला आपल्या शरीराला सुट होईल एवढाच ताण द्यावा.जास्त ताण देऊ नये नियमित सरावानंतर हळू -हळू वेळ (ताण) वाढवू शकता.
♦ सकाळी किंवा सध्याकाळी दोन्हीपैकी कोणत्याही एक वेळी आसने करावी पण सकाळी केल्यास अधिक उत्तम. योगा संध्याकाळी पण करू शकतो पण योगासने करण्याच्या आधी तीन तास काहीही खाऊ नये .
♦ योगा हा प्रशिक्षकाच्या सल्ल्याने किंवा तुम्हाला आधी अनुभव असेल तरच करावा. कारण चुकीच्या आसनामुळे तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो किंवा ताप असेल तर प्रशिक्षकाचा सल्ला घेऊन, योगा करू की नये याचा विचार करावा.
♦ काही जणांना योगा करत असताना त्रास होतो, त्यांनी आपल्या प्रशिक्षकाचा सल्ला घेऊनच योगासने करावी .
♦ योगा करताना जमीन सपाट असावी बेडवर सोफावर योगासने करू नये.
♦ आसने करत असताना कोणाशीही बोलू नका. शांत व एकाग्र चित्ताने श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून आसने करावी तरच त्याचे चांगले परिणाम मिळतात .
♦ स्त्रियांनी मासिकपाळी दरम्यान अधिक रक्तश्राव होत असेल तर योगा करू नये.
♦ आसनांच्या अभ्यासानंतर आपल्याला एक प्रकारची उत्साह, स्फूर्ति व आनंद वाटला पाहिजे. आळस ,जडपणा आणि कंप वाटत असेल तर समजा आसने करताना काहीतरी चुकते आहे, हे जाणून घेता एखाद्या प्रशिक्षकाचा किंवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
♦ गर्भारपणात कपालभाती सारखी कठीण आसने करू नये.प्रशिक्षकाच्या सल्याणीच आसने करावी.
yoga in marathi योग म्हणजे काय? जाणून घेण्यासाठी विझिट करा theyogabhyas.com
2 thoughts on “आसने करताना कोणती काळजी घ्यावी ?”