मित्रांनो आपण आकर्ण धनुरासन माहिती – Aakarn dhanurasan in marathi या लेखात बघणार आहोत.
आकर्ण धनुरासन म्हणजे काय?
‘आ ‘ या उपसर्गाचा अर्थ म्हणजे “कडे “,आणि ‘कर्ण ‘ म्हणजे “कान “.’धनू’ म्हणजे “धनुष्य” . आकर्ण धनुरासान करत असताना आपल्या शरीराचा आकार धनुष्यावर लावलेल्या ताणलेल्या बाणासारखा दिसतो म्हणून त्याला आकर्ण धनुरासान म्हणतात.
आकर्ण धनुरासन करण्याची पद्धत
- आकर्ण धनुरासन करताना प्रथम योगा मॅट वर पाय पसरून शांत बसावे.
- डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवावा.
- डाव्या हाताने उजव्या पायाचा आंगठा पकडावा आणि उजव्या हाताने उजव्या मांडीवर ठेवलेला डाव्या पायाचा आंगठा पकडावा.
- थोडा -थोडा ताण देत डावा पाय उजव्या कानाजवळ आणावा.(शक्य तितकाच ताण द्यावा जास्त ताण देऊ नये)
- ह्या आसन स्थितीत शक्य तितकाच वेळ थांबावे.
- आता पाय अलगद खाली न्यावा , हातांना खाली घ्याव व थोडा वेळ शांत बसावे .
- नंतर हेच आसन दुसऱ्या बाजूने करावे.
आकर्ण धनुरासनाचे फायदे -आकर्ण धनुरासन माहिती – Aakarn dhanurasan in marathi मध्ये पुढीलप्रमाणे दिलेले आहे
आकर्ण धनुरासणाचे फायदे
♦ आकर्ण धनुरासान करताना हातांच्या स्नायूंना ताण पडल्याने स्नायू मजबूत होतात.
♦ पाय , पाठ , कंबर , आणि छातीवर ताण पडल्याने ते मजबूत आणि सुदृढ होतात.
♦ पोटाच्या अवयवांचा चांगला व्यायाम होतो.
♦ दमा आणि खोकला याचा त्रास कमी होतो .
To read more in english visit – The Akarna Dhanurasana: A Yoga Pose For Beginners
श्वास घेण्याची पद्धत
- दीर्घ श्वास घेत पायाला कानाजवळ आणावे.
- आसनस्थितीत असताना श्वास हा नियमित असावा.
- नंतर श्वास सोडून पूर्वस्थितीत यावे.
आकर्ण धनुरासन करताना घ्यावयाची काळजी
- आकर्ण धनुरासन हे खूप अवघड आसल्याने आसन करताना काळजीपूर्वक करावे किवा प्रशिक्षकाचा सल्ला घेऊन करावे.
- आसन करताना घाई करू नये, जेवढा ताण देता येईल तेवढाच द्यावा अतिताण देऊ नये.
- सुरुवातीला आसन करताना पायाचा अंगठा उजव्या कानाजवळ आला नाही तरी चालेल नियमित सरावाने ते शक्य होईल.
निष्कर्ष
तुम्ही तुमचा फिटनेस वाढवण्याचा मार्ग शोधत असाल तर,तुम्ही आकर्ण धनुरासन करण्याचा विचार करू शकता. आकर्ण धनुरासन योग्यरित्या पूर्ण केल्यावर लवचिकता सुधारताना सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याचा हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग असू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्गात असाल, तेव्हा या आसनाकडे लक्ष द्या आणि तुमच्या प्रशिक्षकाला विचारा की तुम्ही प्रयत्न करू शकता का ?
2 thoughts on “आकर्ण धनुरासन माहिती – Aakarn dhanurasan in marathi”